नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

पंढरपूर प्रतिनिधी---
समाजसेवक नितीन काळे यांना पुणे येथील टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काळे हे अनेक वर्षांपासून समाजसेवेचे काम करीत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन आलेले काळे हे आज उंच शिखरावर पोहचताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या अडचणीला व मदतीला धावुन जाणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून काळे यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे. काळे यांचा जनसंपर्क देखील मोठ्या प्रमाणात असुन गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असो अथवा शासकीय कार्यालयातील अनेक कामे असो अधिकारी वर्ग यांना धारेवर धरून आक्रमक भूमिका घेऊन सामान्य जनतेची कामे मार्गी लावतात .काळे यांचे वय पाहता अवघे 24 वर्ष पुर्ण झाली आहेत पण कार्य करताना वयाचा विचार न करता जीवनात अनेक अडचणींवर मात करून यशाचे रहस्य फक्त आणि फक्त कठोर परिश्रम करत राहायचे सामान्य माणसाला कायम मदतीची भुमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करेल पण त्यांना न्याय मिळवून देईल असे नितीन काळे यांनी बोलताना सांगितले. याच सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना तब्बल 25 पुरस्काराने अनेक संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. 
काळे यांना कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तुत्वावर काळे यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात देखील मोठे नाव केले आहे याच कार्याचे कौतुक अनेक वेळा लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री महोदयांनी पत्र पाठवुन प्रत्यक्षात भेटुन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. पंढरपूरात काळे यांना जनसामान्यांचे नेतृत्व प्रत्येकाच्या अडचणीला धावुन जाणारे नेतृत्व म्हणून ओळख आहे. संघटन कौशल्य देखील काळेंकडे असल्याने त्यांना भारतीय जनता पक्षाने अनेक वेगवेगळ्या पदांवर राज्यावर काम करण्याची संधी दिली सध्या ते युवा मोर्चा प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत ते भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. म्हणुनच त्यांना टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंडियन टॅलेंट नॅशनल अवॉर्ड 2024 समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ दिपक जाधव यांनी जाहीर केला होता. काळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुणे येथे स्विकारण्यासाठी पंढरपुर हुन अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योजक राजाभाऊ खोबरे, शिवाजी घाडगे, नागेश बुधवंत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form