अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामचंद्र वेदपाठक यांनी गेली 40 वर्षे स्वखर्चाने सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि लक्षवेधी कार्य केल्याबद्दल त्यांना श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठान कडून "समाज रत्न" पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठान मोडलिंब व शिलेदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहोळ येथील एका शानदार सोहळ्यात चंद्रकांत वेदपाठक यांना स्मुर्ती चिन्ह व पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले आहे.
कालिका उद्योग समूहाचे मुख्य संचालक चंद्रकांत वेदपाठक व त्यांचा परिवाराकडून सोनार समाजातील गरजू मुलांचे मोठ्या प्रमाणात मोफत उपनयन संस्कार करण्यात आले होते, मोठ्या प्रमाणात गरीब महिलांना साडी व धान्य वितरण करण्यात आले होते, राज्यातील शेकडो आदर्श व्यक्तींना सन्मानित करण्यात आले होते अश्या विविध सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय व लक्षवेधी कामगिरी बद्दल चंद्रकांत वेदपाठक यांना समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आल्याने सर्वच क्षेत्रातील दिग्गजाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Tags
सामाजिक वार्ता