अक्कलकोट प्रतिनिधी ---
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना शाखा अक्कलकोटच्या वतीने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ब्यागेहली रोड जवळ वृक्षारोपण कार्यक्रम तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांचा हस्ते संपन्न झाला.
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे सर व संस्थापक सचिव तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे सर तसेच विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख सौ. धनश्री उत्पात, विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख उमेश काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिनेश काटकर यांच्या आदेशानुसार स्वराज्य तालुका अक्कलकोट आयोजित "जागतिक पर्यावरण दिनानिमित्त" ब्यागेहली रोड येथील स्वराज्य चे उपाध्यक्ष गौरीशंकर चनशेट्टी यांच्या घराजवळ "" वृक्षारोपण "" कार्यक्रम बुधवार दि. 5 मे 2024 रोजी सकाळी 10/15 वाजता संपन्न झाला.
या प्रसंगी स्वराज्य चे तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक, उपाध्यक्ष दिपक पोतदार, कार्याध्यक्ष दयानंद बिडवे, उपाध्यक्ष गौरीशंकर चनशेट्टी, सचिव सौ. वर्षा चव्हाण, काशिनाथ पोतदार व पंकज कोरेकर सह इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता