आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात २०२ जणांचे रक्तदान

विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
सांगोला (तालुका प्रतिनिधी):
 शिवसेना विद्यार्थी संघटनेचे सांगोला तालुकाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत सांगोला येथील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून अजिंक्यराणा शिंदे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. 
         शिवसेना प्रणित विद्यार्थी संघटनेचे सांगोला तालुका प्रमुख अजिंक्यराणा शिंदे यांच्या २१ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेना आणि विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. अशा परिस्थितीत रुग्णसेवेला प्राधान्य देत अजिंक्यराणा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २०२ कार्यकर्त्यांनी मतदान करीत अजिंक्यराणा शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. 
       या रक्तदान शिबिरात रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय पाटील, युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागर पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, युवासेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, विजय शिंदे, रमेश शिंदे गुरुजी यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form