पंढरपूर प्रतिनीधी--
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शनिवार दि.२२ जुन २०२४ रोजी आयुर्वेद व्यासपीठ सोलापुर,शाखा-पंढरपूर यांच्या वतीने अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर येथे विद्यार्थ्यांसाठी योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमासाठी अरिहंत पब्लिक स्कूल चे सचिव उज्ज्वलजी दोशी,पुष्पा दोशी मैडम,शाळेच्या प्रिन्सिपल सुप्रिया बहिरट मैडम तसेच आयुर्वेद व्यासपीठ सोलापुर शाखेच्या अध्यक्षा रोहिणी कुलकर्णी मैडम,जेष्ठ वैद्य मिलिंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ.सौरभ सोनवणे यांचे योगदिन व योगाचे महत्त्व या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान झाले..
डॉ.रोहीणी कुलकर्णी मैडम यानी आयुर्वेद व्यासपीठ हे आयुर्वेद प्रचार आणी प्रसार करण्यासाठी करीत असणारया कार्याची सर्वांना माहीती दिली..
डॉ.वर्षा दुरगकर यांनी मुलांना खाण्यापिण्याच्या चुकिच्या सवयी व योग्य आहार या विषयी अतिशय मनोरंजक पध्दतीने मुलांना मार्गदर्शन केले..
डॉ.ज्योती गवळी यांनी मुलांकडून अतिशय शास्त्रशुध्द पध्दतीने योगासनांचे प्रात्यक्षिके करवून घेतली..
खास सोलापुर वरुन उपस्थीती लाभलेले ८६ वर्ष वय असणारे श्री.विठ्ठल महाराज यांनी तर योगाचे काही अशक्यप्राय प्रकार करुन दाखवत मुलांसोबत सर्व उपस्थीतांना अचंबित करुन टाकले..
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.सुमोद दोशी यांनी आभार प्रदर्शन केले..
सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.श्रुती सोनावणे,डॉ.पुरुषोत्तम कोष्टी,डॉ.आशुतोष तोडकरी,डॉ.शिवानी तोडकरी यांचे अनमोल सहकार्य लाभले..
Tags
शैक्षणिक वार्ता