करकंब प्रतिनिधी--
येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत करकंब ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे कृषीदूतांचे आगमन झाले.
त्याप्रसंगी करकंब गावचे सरपंच शरद पांढरे,उपसरपंच देशमुख ग्रामसेवक डॉ सतीश चव्हाण, तसेच गावचे प्रतिष्ठत ग्रामस्थ व प्रगतशील शेतकरी सर्वांनी कृषीदूतांचे स्वागत करण्यात आले .कृषीदूतांनी ग्राम पंचायतिला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यामध्ये भोसले कन्हैया , सुपेकर सूरज ,फुले अभिषेक, भागवत शिवाजी,डोंगरे जोतिबा, जाधव सुनिल आदी कृषीदूतांचा समावेश आहे.सर्व ग्रामस्थांनी सर्व कृषी दूतांना आपल्या या शैक्षणिक उपक्रमासाठी आपण सहकार्य करू, असे सांगितले, तसेच या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक शंकर नेवसे, अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा. यादव एस. व्ही,प्रा. माने सी. बी. प्रा. काळे ऋषीकेश आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
Tags
शैक्षणिक वार्ता