पंढरीच्या शिरपेचात मानाचा तुरा,
पुणे येथे होणार पुरस्कार प्रदान
पंढरपूर(प्रतिनिधी)--
पंढरपूरमधील कायमच चर्चेत असणारे समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून देण्यात येणारा ' समाजभूषण पुरस्कार' 2024 पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा ' समाजभूषण पुरस्कार ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पंढरपूर शहरातील निराधार अनाथ तसेच समाजापासून दूर राहणार्या अनेक समाज बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम पंढरपूर येथील मेडीकल व्यवसायिक समाजसेवक मुजम्मील कमलीवाले अनेक वर्षांपासून करत आहेत.त्यांच्या या अनोख्या समाजकार्याचा ठसा मनामनावर उमटला आहे.
समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना सामाजिक व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.या पुरस्कारचे स्वरुप सन्मानपत्र,मानचिन्ह,शाल,भेटा,श्रीफळ असे आहे.या पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित 29 जुन 2024 रोजी पुणे या ठिकाणी पार पाडणार आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंढरपूर स्तरातून कौतुक होत आहेत.
Tags
सामाजिक वार्ता