उदगीर प्रतिनिधी--
वैद्यकीय क्षेत्रातील पुणे येथील एक नामवंत डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असून त्यांनी महाराष्ट्र सह अनेक राज्यामध्ये योग, प्राणायाम, आहार, जीवनशैली, वजन कमी करणे ,महिलांचे थायरॉईड या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. उदगीर येथील भारतीय महिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था उदगीर द्वारा संचलित असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रघुकुल मंगल कार्यालय उदगीर येथे आयोजित केलेल्या व्याख्यानमाला प्रसंगी लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया, विश्वक्रांती पत्रकार महासंघ ऑल इंडिया ,आमची माती आमचं भूषण आम्ही सर्व उदगीरकर ,टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र ,मराठवाडा शिक्षक संघ लातूर जिल्हा ,अखिल भारतीय स्वर्णकार समाजाच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर यांचा बालाजी सुवर्णकार यांनी सन्मान आला.
डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर हे वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दल भारतीय महिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था उदगीरचे संस्थापक अध्यक्ष गोविंद निटुरे ,लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले, कोषाध्यक्ष सौ.श्वेता ताई राहगंडाले , सचिव जाफरखान शेख,सहसचिव सौ. दर्शनाताई घुले, महासचिव सुभाष तगाळे, महिला महासचिव विमलताई मदने , महाराष्ट्राचे प्रसिद्धीप्रमुख शिवाजी निरमनाळे, महाराष्ट्राच्या महिला सचिव सौ.शोभाताई श्रीमंगले ,पुणे जिल्हा अध्यक्ष नामदेव सुवर्णकार, सचिव मधुकर टोम्पे, कार्याध्यक्ष आत्माराम ढेकळे ,दैनिक दंडाधिकारी चे मुख्य संपादक अर्जुन डी जाधव, महाराष्ट्र यूट्यूब चैनल चे मुख्य संपादक समशेर खान गोलंदाज,ओबीसी हक्क परिषद दिल्ली शाखा लातूर जिल्हा अध्यक्ष मोहन पोतदार ,विश्वकर्मा समाज संघटनेचे राज्य संपर्क
प्रमुख सुदर्शन बोराडे, लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया लातूर जिल्हा उपाध्यक्ष
सुधाकरराव, लातूर महिला जिल्हाध्यक्षा सौ. स्मिताताई पोतदार, कार्याध्यक्ष शोभाताई सुवर्णकार ,सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण प्रशिक्षण केंद्र उदगीरच्या संचालिका महानंदा सुवर्णकार, यांनी त्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील उत्कृष्ट कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
Tags
सामाजिक वार्ता