सोलापूर लोकसभा मतदार संघातील पहिली महिला खासदार...
सोलापूर प्रतिनिधी --
खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाने सोलापूर लोकसभा मतदार संघात व काॅंग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झालेचे सध्या पहावयास मिळत आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जवळपास ७५ हजार मतांनी विजय मिळवलाय. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव झालाय. १९५१ पासून एकदाही सोलापुरात महिला खासदार जिंकून आल्या नव्हत्या हा इतिहास आज मोडलाय.
सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशिलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. तर २००४ साली प्रणिती शिंदेंच्या आई उज्वला शिंदेंचा पराभव झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांच्या पऱाभवाचा वाचपा काढला आहे.
१९५१ पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे १४ वेळा खासदार झाले होते, पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या. पण २०२४ च्या निवडणुकीत सोलापूरकारांनी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत इतिहास रचलाय.
चौकट --
माझा विजयाचे श्रेय शेतकरी, कष्टकरी, सामान्य मतदार,बिडी कामगार, महिला, युवा, युवती यांच्यामुळेच तसेच लोकशाही मार्गाने व लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य केले म्हणून माझा विजय बहुमताने निवडून आले
-- खासदार प्रणिती शिंदे
Tags
राजकीय वार्ता