श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाकडी मेघडंबरी अर्पण

पंढरपूर प्रतिनीधी--
 श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री.विठ्ठल गाभारा व श्री.रूक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील नव्याने तयार करून बसविण्यात येत आहे. त्यासाठी श्रीसंत कबीर महाराज मठ व फडातर्फे सेवाभावी तत्वावर दोन मेघडंबरी मंदिर समितीस उपलब्ध करून दिल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
सदरच्या दोन्ही मेघडंबरी आज समितीस प्राप्त झाल्या असून, मेघडंबरीचे पुजन मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल सभामंडप येथे करण्यात आले आहे. तसेच कबीर महाराज मठाचे ह.भ.प.विष्णू महाराज कबीर, तेजस फर्निचरचे  मिलिंद करंडे व पांडूरंग लोंढे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ, ज्ञानेश्वर कुलकर्णी, बलभीम पावले, राजेंद्र सुभेदार, अतुल बक्षी, अमित नवाळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
सदरच्या दोन्ही मेघडंबरी तेजस फर्निचर पंढरपूर येथील अमोल सुतार, बाळू सुतार, पांडूरंग लोंढे या कारागीराने तयार केल्या असून, त्यासाठी  देवरूख  जि. रत्नागिरी येथील 3 ते 4 वर्षापूर्वीच्या सागवाणी लाकडाचा वापर केला आहे. मेघडंबरीचे अनुक्रमे 160 व 110 किलो वजन आहे, सुमारे 3 लाख 50 हजार इतके बाजारमुल्य आहे व तयार करण्यासाठी 35 ते 40 दिवसाचा कालावधी लागला आहे. सदरचे काम मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. सदरच्या दोन्ही मेघडंबरीला चांदी लावून आषाढी यात्रेपूर्वी गाभा-यात बसविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी यावेळी सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form