पंढरपूर प्रतिनीधी--
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) इंजीनियरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला बुधवार दिनांक 29 मे 2024 पासून सुरुवात झाली आहे .या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 25 जुन 2024 आहे. अशी माहिती (डीटीई) कडून देण्यात आलेली आहे.
कोर्टी तालुका पंढरपूर येथील न्यु सातारा समूह संचलित मुंबई , न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर क्रमांक (6725) ची मान्यता मिळाली असून दिनांक 29 मे 2024 वार बुधवारपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार दिनांक 25 जून 2024 पर्यंत चालणार आहे अशी माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी दिली.
तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत केंद्र फॅसिलिटेशन सेंटर (FC)क्रमांक 6725 म्हणून न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कोर्टी या महाविद्यालयास मिळाले आहे.
पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजीनियरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करणे व शंका अडचणी यांचे निरसन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरू केले असून, सर्व दहावी मधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 29 मे 2024 ते 25 जून 2024 या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थी व पालकांना लाभ होण्याच्या दृष्टीने, न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निकने आव्हान केले आहे. या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंड, ऑप्शन फॉर्म भरण्यापर्यंतची ऑनलाईन प्रक्रिया सुविधा चालू केलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक मधील फॅसिलिटेशन सेंटर (FC)चा नक्कीच फायदा होईल असे पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता