पंढरपूर प्रतिनिधी--
मोहळ विधानसभा राखीव मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे बोअर पाडून मोटार बसवून दिली आहे. यामुळे दलीत वस्तीतील कायमचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
रविवार दि ९ जून रोजी कोरवली येथील भिमनगर दलित वस्तीमधील ग्रामस्थासाठी समाजसेवक राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून पाण्याची सोय सुरू झाली. खरे यांचे बंधू-विजय खरे यांच्या हस्ते पाण्याच्या बोरची पूजा करण्यात आली.यावेळी गावातील मान्यवर उपस्थित होते.
धर्मा कांबळे ,शंकर तिर्थे, विक्रम तीर्थे .बबन कांबळे,.दत्तात्रय कांबळे,कोरवली मासिक तिर्थे,आविनाश गायकवाड, प्रकाश तुपलोंढे,शहाजी तिर्थ.सुरेश तिर्थे,गणेश तिर्थे,तानाजी कांबळे,अजय तिर्थे,स्वप्नील तिर्थे,मा.अमर तिर्थे,सागर कांबळे,विनोद तिर्थे,विशाल तिर्थे,माऊली तिर्थे,गौतम तुपलोंढे,राहूल कांबळे आदीसह.महिला-पुरूष कोरवली ग्रामस्थबहुसंख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता