डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स श्रेणीचे मानांकन
पंढरपूर प्रतिनीधी--
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला 'ओबीई रँकिंग्ज २०२४' मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे स्वेरीला ‘डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स’ या श्रेणीचे मानांकन मिळाले आहे.
आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) क्षेत्रात उत्कृष्टता साध्य केल्याबद्दल हा सन्मान स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देण्यात आला आहे. सदरचे मानांकन हे 'आर वर्ल्ड इन्स्टिट्युशनल रँकिंग' यांच्याकडून प्रदान करण्यात आले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पंढरपूर पॅटर्न’च्या माध्यमातून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘शैक्षणिक क्रांती’ होत आहे. या सन्मानामुळे स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक व व्यवस्थापकीय कार्यक्षमतेला एक नवी ओळख मिळाली आहे तसेच आऊटकम-बेस्ड एज्युकेशन साठी केलेल्या प्रयत्नांची पावती देखील मिळाली आहे. भारतात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये असताना केवळ तंत्रशिक्षणाचा निकष लावून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स’ या श्रेणीत मानांकन प्रदान करण्यात आले आहे. गेल्या महिन्यामध्ये 'आर वर्ल्ड इन्स्टिट्युशनल रँकिंग' यांनी 'ओबीई रँकिंग्ज २०२४' साठी संपूर्ण देशभरातून प्रस्ताव मागवले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीई रँकिंग्जचे समन्वयक प्रा.दिगंबर काशीद यांच्या सहकार्याने या रँकिंग मध्ये सहभाग नोंदविला होता.
Tags
शैक्षणिक वार्ता