श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथील कर्मचारी यांचा प्रामाणीकपणा

 
पंढरपूर प्रतिनीधी--
पंढरीतील या युवकांचा हा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आणि खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहे आपल्या पंढरपूरचे नाव उंचावणारे आहे.प्रशांत उराडे, अनिरुद्ध कुलकर्णी व शहाजीराजे देवकर या तिघांचा प्रामाणिकपणा आज दिसून आला.


दिल्ली येथील श्री विठ्ठलाचे भक्त श्री मनीष गुप्ता  रा. दिल्ली यांची आज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नित्य पूजा व रात्रीची पाद्यपूजा अशा पूजेचे आज दर्शन घेऊन गुप्ता कुटुंबीय आनंदून गेले.

१०/०६/२०२४ रोजी आज श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची पाद्य पूजा झाल्यानंतर गुप्ता कुटुंबीयांच्या  मनीष गुप्ता यांच्या बोटातील अंदाजे एक तोळा वजनाची हिरेजडीत अंगठी हरवली परंतु हे कोणाच्याही लक्षात आले नाही. दस्तूरखुद्द गुप्ता कुटूंबियांच्याही आनंदाच्या भरात लक्षातु नव्हते.

सर्व भाविक गेल्यानंतर पूजा झाल्यानंतर मंदिराच्या या कर्मचाऱ्यांना अंगठी सापडली ती अंगठी कोणाची याचा शोध घेऊन मंदिर समितीचे कर्मचारी प्रशांत उराडे, अनिरुद्ध कुलकर्णी व शहाजीराजे देवकर यांनी त्या भाविकांना फोन करून वस्तूची खातर जमा करून त्यांना ती अंगठी पोहोचवण्याचे काम केले.

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form