विठू माऊलीच्या रूपाने पंढरपुरातील माय बाप जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे माझा विजय-- खा.प्रणिती शिंदे

पंढरपूर तालुक्यातील जनतेचे तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे यांचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व उज्वला शिंदे यांनी मानले आभार... 
पंढरपूर प्रतिनीधी--
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे, महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पंढरपूर शहरातील दाते मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता.

पंढरपूर तालुक्यातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

मेळाव्याच्या सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन राज्यात समाधानकारक पाऊस पडू दे शेतकरी सुखी समाधानी राहू दे अशी विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घातले.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आभार व्यक्त करताना म्हणाले की, ही निवडणूक अवघड होती. पण उन्हातान्हाची  पर्वा न करता प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याने नेत्याप्रमाने काम केले त्यामुळे माझा विजय झाला लोकशाहीची ताकद दाखवून दिले. विरोधक दबावाचे राजकारण करत असताना जनतेने शांततेत क्रांती केली. तुमची सेवा करण्याची संधी लाभली माझे हे अहो भाग्य, मला सत्तेचा मोह नाही. लहानपणापासून सत्ता बघितली आहे. शेतकरी आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यात मी पांडुरंग बघते तुमची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, आज मला भारत नानाची आठवण येते विधानसभेत पंढरपूरचे प्रश्न मांडायला उभे राहिले की सभागृह शांत व्हायचे ते अतिशय आत्मीयतेने पंढरपूरचे प्रश्न मांडत राज्यात महाविकास आघाडीला मोठ्ठे यश लाभले, ताकद मिळाली पंढरपुरातून ही माहाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे म्हणून भगीरथ भालके तयारीला लागा असे म्हणाले. पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पंढरपूर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात येथे येणाऱ्या भाविकांची चांगल्या पद्धतीने सोय व्हावी शिवाय पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी केंद्राच्या पर्यटन सूचीमध्ये पंढरपूरचा समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे. सूचीमध्ये समावेश झाल्यानंतर पर्यटन विभागाच्या अनेक योजना येथे राबवत्या येथील चंद्रभागेचा देखील विकास यातून करता येईल त्यासाठी पर्यटन सूचीमध्ये समावेश होणे आवश्यक आहे संसदेत शेतकऱ्यांचे, मराठा आरक्षणाचे प्रश्न मांडणार आहे. येत्या काळात पर्यटन मंत्राची भेट घेऊन त्या संदर्भात पाठपुरावा करेन असे सांगितले.

या कृतज्ञता मेळाव्यास युवा नेते भगीरथ भालके, नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, चेतनभाऊ नरोटे, अमर सूर्यवंशी, संदीप पाटील, मनोज यलगुलवार, शिवसेनेचे नेते संभाजी शिंदे, रवी मुळे, कुमार घोडके, राष्ट्रवादीचे नागेश फाटे, सुभाष भोसले, राजश्री ताड, प्रकाश तात्या  पाटील, सूनंजय पवार, संदीप शिंदे, नागेश गंगेकर, आदित्य फत्तेपुरकर, किरणराज घाडगे, मिलिंद भोसले, सतिष शिंदे, सोमनाथ आरे, नितीन शिंदे, रमेश भोसले, राहुल पाटील, राजू उराडे, प्रशांत मलपे, महादेव धोत्रे, प्रशांत शिंदे, अरुण कोळी, अनिल अभंगराव, ऋषिकेश भालेराव, राहुल साबळे, महमद उस्ताद, सलीम मुलाणी, सादिक मुलाणी, यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form