श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर मध्ये प्रवेशोत्सव उत्साहात

पंढरपूर प्रतिनीधी--
श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळेत नवागतांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रमोद जाधव व श्री सोमनाथ राजगुरू हे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर होते.
    शाळेत दाखल झालेल्या नवागत मुलांचे स्वागत शैक्षणिक साहित्य, शालेय पाठ्यपुस्तके ,पेन ,फुगे देऊन करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. मुलींनी रांगोळी काढून ,तोरण व पताका बांधून शाळा सजवण्यात आली होती.
    मुलांना पहिल्या दिवशी नवीन पुस्तके मिळाल्याने मुले आनंदी दिसत होती. तर काहींना शाळेच्या दुनियेत पहिले पाऊल ठेवणे जड गेले. पालकांना सोडून वर्गात  जाताना काही मुलांचे डोळे भरून आले. 
    संस्था सचिवा मा. सुनेत्राताई पवार यांनी  विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पालक श्री प्रमोद जाधव यांनी मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून अभ्यास करण्याचे व उज्वल यश  संपादन करण्याचे आवाहन केले.
  पहिल्या दिवशी मुलांना गोड खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री अशपाक मुजावर यांनी केले तर आभार श्री महेश भोसले यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form