नाझरे प्रतिनिधी--
सांगोला येथील प्रसिद्ध व्यापारी निलेश उर्फ राजू नानासाहेब होनराव यांचा चिरंजीव शिवांश हा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये दुहेरी सुवर्णपदक पटकावून यश प्राप्त केले त्याबद्दल त्याचा कोल्हापूर येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
वाघमारे सरांकडे शिवांश हा सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर कराटे प्रशिक्षण घेत आहे तसेच तो सिंहगड पब्लिक स्कूल चा पहिलाच विद्यार्थी आहे. त्याच्या सत्कार प्रसंगी छत्रपती शाहू महाराज, विश्वविजय दादा खानविलकर व शिवांश चे वडील निलेश उर्फ राजू होनराव आई समृद्धी होनराव उपस्थित होत्या. तसेच वाघमारे सरांनी त्याचे अभिनंदन केले आहे व त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता