पंढरपूर येथे महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पंढरपूर प्रतिनिधी -- 
भगवान महावीरांची 2623 वी जन्म कल्याण महोत्सव सोहळा पंढरपूर या ठिकाणी मंगलमय व उत्साह पूर्ण वातावरणामध्ये आधारस्तंभ धर्मानुरागी डॉ. शितल शहा, महोत्सव समितीचे अध्यक्ष धर्मानुरागी  प्रकाश  मंगळवेढेकर, कार्याध्यक्ष धर्मानुरागी आर के दोशी यांच्या उपस्थितीत  आजचे ध्वजारोहण धर्मानुरागी अमोल बाबुराव भालेराव यांच्या हस्ते  होऊन मिरवणूक पालखीने सुरुवात झाली.

 त्या प्रसंगी पद्मावती महिला मंडळ यांचा सुरेख असा झांज पथकाचा कार्यक्रम उत्कृष्ट सादरीकरण झाले पंढरपुरातील सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सायंकाळी भगवान महावीरांचा पाळणा कार्यक्रमांमध्ये सौ सुप्रिया प्रशांत मंगळवेढेकर यांनी मातेचा तर सौ वृषाली श्रीकांत खडके यांनी भगवान महावीराच्या आत्याचा मान मिळाला. रसपानाचा कार्यक्रम  कुलभूषण सचिन भाळवणकर यांच्यातर्फे होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रम श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार पंढरपूर या ठिकाणी पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form