पंढरपूर शहर गुन्हे शाखेने मोटार सायकल चोरी करणारी चोर टोळी जेरबंद...

१२,७०,०००/- रुपये किंमतीच्या एकूण २६ मोटार सायकली केल्या जप्त
पंढरपूर प्रतिनिधी---
पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे  दाखल असून सदर गुन्हयाचे तपासकामी डॉ. अर्जुन भोसले सोो,उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे  प्रकाश भुजबळ, सहा. पोलीस निरीक्षक व त्यांचे पथकास बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील रेकॉर्डवरील आरोपींनी सदरचा गुन्हा केला असल्याची गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने सदर आरोपीतास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विश्वासात घेवून तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयाचे तपास कामी अटक केली.

सदर गुन्हातील भंडीशेगाव, ता. पंढरपूर येथील आरोपीकडे चोरीच्या मोटार सायकली बाबत कौशल्यपूर्ण चौकशी केली असता चौकशी अंती सदर त्यांने पंढरपूर शहर पोलीस ठाणे  दाखल गुन्हयातील मोटार सायकली चोरी केल्याचे सांगुन त्याने मोटर सायकली काढुन दिल्याने त्या गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आल्या असुन तो सदया न्यायालयीन कोठडीत आहे.

तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणेत दाखल असून सदर गुन्हयाचे तपासकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे भुजबळ, सहा. पोलीस निरीक्षक व त्यांचे पथकास बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील रेकॉर्ड वरील आरोपीने केला आहे. सदरचा आरोपी हा अनिल नगर, पंढरपूर येथील आहे. त्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने सापळा रचून ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सोलापूर जिल्हयातील व इतर जिल्हयातील मोटार सायकली चोरुन त्या मोटार सायकली यातील साक्षीदार यांना दिल्याचे सांगितल्याने आम्ही सदर साक्षीदार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्या मोटार सायकली आरोपीकडून घेतल्या असल्याचे सांगितले तसेच सदर मोटार सायकली साक्षीदार यांनी पोलीस ठाणेस हजर केल्या आहेत. सदर गुन्हयात निष्पन्न झालेला ०१ आरोपीस अटक करणे बाकी असुन आरोपीचा शोध चालु आहे.

एकुण २६ मोटर सायकली किंमत रू.१२,७०,०००/- जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक  शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस
अधिक्षक प्रितम यावलकर सोा, .डॉ. अर्जुन भोसले सोा,उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि प्रभाकर भुजबळ, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ नागनाथ कदम, पोहेकॉ/ शरद कदम, पोहेकॉ/ बिपीनचंद्र ढेरे, पोहेकॉ/ सुरज हैबाडे, पोहेकॉ/ सचिन हैबाडे, पोहेकॉ/नवनाथ मानेपोहेकॉ/ गोडसे, पोकॉ/ समाधान माने, पोकॉ/ शहाजी मंडले, पोकॉ/ बजरंग बिचुकले, पोकॉ/ निलेश कांबळे, पोकों/योगेश नरळे (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस पोहेकॉ, नवनाथ माने हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form