पंढरपूर प्रतिनिधी---
पंढरपूर तालुका पोलीस पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अवैधरित्या विक्री करणाऱ्या दारू अवैध धंद्यावर धाड करून एकूण 21 हजार रुपये मुद्देमाल केला.
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व स्टाफने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खर्डी तारापूर ओझेवाडी या गावात रेड करून एकूण देशी विदेशी कंपनीचे नऊ बॉक्स दारू एकूण किंमत रुपये 21 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असून खर्डी येथील दोघाजणाविरुद्ध तसेच येथील दोघाजणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सरदेशपांडे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले याच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहायक फौजदार तोंडले पोलीस हवालदार गजानन माळी पोलीस हवालदार सुनील मोरे पोलीस कॉन्स्टेबल नलावडे पोलीस हेडकॉन्स्टेबल वाडदेकर पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर शिंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल चंदनशिवे हनुमंत शिंदे यांच्या पथकाने केली आहे
Tags
पोलिस प्रशासन वार्ता