विठाई वारकरी गुरुकुल येथे मराठी दिनाच्या निमित्ताने कवी संमेलन संपन्न...

पंढरपूर प्रतिनिधी ---
तपोवन बहुउद्देशिय सामाजिक संस्था संचलित विठाई वारकरी गुरुकुल तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विठाई वारकरी गुरुकुल तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे निमंत्रित कवींच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकदैवत पंढरीचा पांडुरंग आणि माता रुक्मिणीच्या पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कविसंमेलनमध्ये कवी संभाजी अडगळे, हरीचंद्र पाटील, आशा पाटील, वीणा वोहरा, भास्कर बंगाळे, मधुरा कुसुमडे, माऊली मस्के, दत्ता तरळगट्टी,  सचिन कुलकर्णी, रुद्र पवार इत्यादी कवींनी आपापल्या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 

मराठी भाषा ही आपली मायबोली असून महाराष्ट्रतील सर्व संतांनी मराठीतून साहित्य निर्माण केले त्यामूळे मराठी भाषा श्रेष्ठ आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक व पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे साधारण स्वरूप आणि हेतू मसापचे कार्यवाह कल्याणराव शिंदे यांनी व्यक्त केले. प्रा. रमेश शिंदे यांनी विठाई वारकरी गुरुकुल तीर्थक्षेत्र पंढरपूर हे एक माणूस घडवणारे गुरुकुल असल्याची भावना व्यक्त केली तर राजेश पवार यांनी शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तपोवनचे बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माधुरी भोसले यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. कीर्तन, प्रवचन, भजन, भारुड तसेच भाषण यासह अनेक कलांचे प्रशिक्षण देणारे हे तपोवन हे येत्या काळात मोठे होणार अशा भावना ऊपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. 

तपोवन बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे सचिव सुर्याजी भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक  व सूत्रसंचालन केले तर सदस्य संतोष कसगावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form