भारत-तिबेट सहयोग मंचच्या महाराष्ट्र प्रांत मंत्रीपदी मंगळवेढ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश जोशी ...

मंगळवेढा प्रतिनिधी ---
भारत-तिबेट सहयोग मंचच्या महाराष्ट्र प्रांत मंत्रीपदी मंगळवेढ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश दिनानाथ जोशी यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत भारत-तिबेट सहयोग मंचचे राष्ट्रीय मंत्री व माजी आमदार नरसिंग मेंगजी यांचे हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र- गुजरात-गोवा चे क्षेत्रीय संयोजक मोहन बागमार,पुणे महानगर अध्यक्ष चेतन शर्मा आदी उपस्थित होते.                          
याप्रसंगी सुरेश जोशी यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात असून मंगळवेढ्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होत आहे.सुरेश जोशी यांनी यापूर्वी कारसेवक,मंगळवेढा विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे तालुका अध्यक्ष, नूतन मराठी विद्यालयाचे संचालक,भाजपाचे प्रांत परिषद सदस्य,मंगळवेढ्याचे उपनगराध्यक्ष आदी विविध पदांवर काम केलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form