सोनार समाज बांधव राज्यात लयं भारी

 सोलापूर सोनार बांधवांचा राज्यात डंका
सोलापूर --प्रतिनिधी 
अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ, शिवशंकर टॉवर, पाम बिच नवी मुंबई या कन्नड अल्पभाषिक संस्था व लायन्स क्लब  ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विध्यमाने आरोग्य, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाज सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय आणि लक्षवेधी कार्य केलेल्या व्यक्तींची त्यांच्या कामाच्या मूल्यमापनावरून निवड मंडळाने विविध पुरस्कारासाठी निवड करून दि 4 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या थाटात आणि दिमाखात पार पडला. हे नमूद करायचे कारण म्हणजे या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या व्यक्तिमध्ये सोनार समाजाचे 5 व्यक्तीचा समावेश होता, त्यात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मान करी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री वसंतराव बळीराम पोतदार, राज्यस्तरीय समाज भूषण रत्न पुरस्कार मानकरी श्री वसंत रामचंद्र पोतदार सेवा निवृत्त नायब तहसीलदार तथा अध्यक्ष सोनार समाज संघटना सोलापूर व श्री विजयकुमार कृष्णात पोतदार सेवा निवृत्त नायब तहसीलदार तथा उपाध्यक्ष सोनार समाज संघटना सोलापूर,  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न मानकरी, ग्लोबल टीचर अवार्ड प्राप्त श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्य माध्यमिक प्रशाला करजगी तालुका अक्कलकोट येथील सहशिक्षक श्री किशोरकुमार गंगाधर पोतदार आणि सोलापूर येथील पदमश्री सुमतीबाई शहा इंग्लिश मेडीयम तांत्रिक प्रशाला येथील अधिव्याख्याती श्रीमती राजश्री  वेंकटेश पोतदार यांचा समावेश आहे.
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेल्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या  वरील कर्तृत्वान व्यक्तींचा नुकताच सन्मान करण्यात आला, या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कार्थिनी आपल्या प्रतिक्रिया  मराठी बाणा न्युज कडे व्यक्त केल्या.
@ जेष्ठ स्वा. सै. वसंतराव बळीराम पोतदार  -- हा पुरस्कार म्हणजे माझ्या देश सेवेचा व सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे. या सन्मानामुळे जीवनात आजवर केलेले मेहनत, निष्ठा  आणि प्रामाणिक पणा बद्दल अभिमान वाटतो. हा पुरस्कार मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील.
 
श्री वसंत रामचंद्र पोतदार -
हा पुरस्कार स्वीकारणेस मी अहमदाबाद येथे असल्याने उपस्थित राहू शकलो नाही याची खंत वाटते. हा पुरस्कार मला घोषित झाल्यावर मनापासून आनंद झाला. गेली 33 वर्षे  प्रशासकीय सेवेत आणि गेली 28 वर्षांपासून सामाजिक सेवेत केलेल्या व करीत असलेल्या कार्याचे व यशाचे प्रशस्तीपत्रकच मिळाले आहे. हे आम्हाला ऊर्जा देणारे, प्रोत्साहन देणारे , प्रेरणादायी आहे. त्यामुळं आम्ही त्यांचे आभार मानतो. माझ्यावतीने माझा पुरस्कार श्री विजयकुमार पोतदार यांनी स्वीकारला.
 
श्री विजयकुमार पोतदार -
या पुरस्कारामुळे केलेल्या कामाचे फलित झाले आहे. आता खांध्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाज सेवेचा हा घेतलेला वसा पूर्णतःवास आम्ही नेतो याची खात्री देतो. पुरस्कारासाठी शासन सेवेतील 33 वर्षे व सामाजिक सेवेतील गेली 17 वर्षे केलेल्या कामाची दखल घेतल्याबद्दल व पुरस्कार स्वरूपात केलेल्या कामाची पावती दिल्याबद्दल आभार मानतो.

श्री किशोरकुमार पोतदार -
हा पुरस्कार म्हणजे मला, माझ्या शैक्षणिक व सामाजिक  कार्याचा केलेला सन्मान आहे. हा माझ्या आयुष्यातील विशेष भाग्याचा दिवस आहे. या सन्मानाने आयुष्यात आजवर केलेले कष्ट, मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणा बद्दल, अभिमान वाटतो. मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील.

श्रीमती राजश्री पोतदार -- 
कर्मन्ये वाधिकारास्ते मा फले्षू कदाचन हे मनात ठेऊन प्रत्येक शिक्षक विध्यार्थ्यांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. आपल्या प्रामाणिक पणाचे कौतुक कोणी जाणीवपूर्वक केले तर ते मनाला सुखावून जाते. आणि पुढील प्रगतीसाठी स्फूर्ती मिळते. लायन्स क्लब व अपूर्वा ज्ञानपीठ संस्थेने आम्हास पुरस्कार प्रदान करून आमच्यावर सातत्य राखण्याची आणि प्रगतीची नवी शिखरे गाठण्याचे आणि ध्येय ठेवण्याची जबाबदारी सोपाविली आहे. कार्यक्रमाचे नियोजन, निवडलेले ठिकाण, शिस्तबद्ध मांडणी आणि एकूणच कार्यक्रमाचे स्वरूप एकदम झकास होते . कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर व त्यांचे मार्गदर्शन उल्लेखनीय होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form