कु. श्रद्धा वेदपाठक सोनार समाजाचे गौरव

योगातील राष्ट्रीय स्थरावरील प्रथम पारितोषिक प्राप्त.....
सोलापूर प्रतिनिधी----
येथील सोनी महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सोनी टॅलेंट सर्च 2023 --24 या परीक्षेतील यशस्वी विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्तरीय खेळामध्ये सहभागी आणि राष्ट्रीय स्तरावर योगा स्पर्धेत सलग 13 वेळा सहभाग नोंदवलेली विध्यार्थिनी, तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम आलेली  B. Sc. ( ECS ) विभागाची विध्यार्थिनी कुमारी श्रद्धा दत्तगुरु वेदपाठक हिचा आदर्श विध्यार्थी म्हणून पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. 

कुमारी श्रद्धा च्या यशामुळे सोनार समाजाचा लौकिक होत असून ही गुणवंत विध्यार्थिनी सोनार समाजाचे गौरव आहे. आदर्श विध्यार्थी हे आपल्या कुटुंबाची, समाजाची पर्यायाने देशाची शान असतात. योगातील राष्ट्रीय स्थरावरील प्रथम पारितोषिक मिळविल्याबद्दल पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटनेच्या वतीने तिला राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

कु श्रद्धा ही पदमश्री सुमतीबाई शहा इंग्लिश मेडीयम तांत्रिक प्रशालेचे निवृत्त शिक्षक तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा, सोलापूरचे सचिव  दत्तगुरु वेदपाठक यांची कन्या आहे. कु श्रद्धा च्या घवघवीत आणि नेत्रदीपक यशाबद्दल तसेच आदर्श विध्यार्थी पारितोषिक मिळाल्याबद्दल सोनार समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य अनुक्रमे सर्वश्री वसंत पोतदार, विजयकुमार पोतदार, गिरीश जमखंडीकर, गजानन सोनार, इंजि विजयकुमार पोतदार, इंजि आर एम दोडमनी, प्रा अमर दीक्षित, डॉ दीपक पोतदार, सतीश जेऊरकर, मोहन पोतदार, सुधीर धोत्रीकर, अग्रणी प्रवतर्क सर्वश्री मोहनराव मंद्रूपकर, संजय मैदर्गीकर, उमेश कुरुलकर, संतोष कळमणकर आणि मराठी बाणा न्युज चे संपादक विनोद पोतदार यांनी कु श्रदा चे अभिनंदन आणि कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form