पंढरपूर प्रतिनिधी --
येथील पंढरपूर समाजसेवक युवा कार्यकर्ते शंकर शिंदे नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंढरपूर शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली या निवडीचे पत्र पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे, पंढरपूर शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, ॲड.दिपक पवार, सुधीर भोसले यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी शंकर शिंदे नाईक म्हणाले की पक्ष बळकटीकरण करणे तसेच पक्षाचे ध्येय धोरणे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार,खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमाणीक प्रयत्न करेन तसेच पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे पूर्ण विश्वासने काम करेण पक्ष वाढीसाठी व पक्षांमध्ये युवकांचे स्थान प्रकट करण्यासाठी प्रयत्न करेन असे ते म्हणाले.
याप्रसंगी पक्षातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर नियुक्तीमुळे त्यांना सर्व स्तरातील लोकांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
राजकीय वार्ता