सांगोला प्रतिनिधी ---
श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत२७ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थिनी घवघवीत यश संपादन केले आहे अशी माहिती मुख्याध्यापक मनोहर इंगवले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून सदर परीक्षेमध्ये श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेतील २७ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये श्रावणी राजू कदम,श्रेया अंबादास भोसल,प्रज्ञेश गणेश कदम,शुभम संजय भोसले,प्रशांत अशोक जाधव,मृणाली संतोष गायकवाड़,
सार्थक सत्यवान जगदाळे,अमिशा राजू सरगर,राजवर्धन तुकाराम माने,सार्थक सचिन रोंगे,यशराज मच्छिंद्र शिनगारे,पायल रामा भोसले,लक्ष्मी दिलीप काटे,ओंकार दिलीप सावंत,आदर्श किसन शिनगारे,प्रणाली जालिंदर फाटे,स्वीटी दिपक जगदाळे,उबाले प्रतीक्षा दयानंद या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.शिवराज रामदास भोसले तसेच माणिक भोसले (सेवानिवृत्तआय.एफ.एस.अधिकारी) मुख्याध्यापक मनोहर इंगवले यांनी केले.
तसेच या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहशिक्षक नामदेव हजारे,रामचंद्र वाघमोडे, विजयकुमार जगताप, सुनील लिगाडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल धायटी ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता