सोलापूर प्रतिनिधी --
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात पदमश्री सुमतीबाई शहा इंग्लिश मेडीयम तांत्रिक प्रशालेचे अधिव्याख्याते श्रीमती राजश्री व्येंकटेश पोतदार यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि लक्षवेधी कामगिरी बद्दल अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विध्यमाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रांतपाल माननीय भोजराज नाईक निंबाळकर यांचे हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष ला. ईश्वर झुंजा, अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ सोलापूर चे अध्यक्ष ला.अभिजित भांजे, संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती, अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ ला. अशोक भांजे, खजिनदार चंद्रकांत कुलकर्णी, सचिव शलाका कुलकर्णी, माजी प्रांतपाल ला. कापसे साहेब आदींच्या उपस्थित संपन्न झाला. श्रीमती राजश्री पोतदार यांचा, पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Tags
सामाजिक वार्ता