राज्यस्तरीय समाजभूषण रत्न पुरस्काराने विजयकुमार पोतदार सन्मानित...

सोलापूर प्रतिनिधी -
 दिनांक ४फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता डॉ निर्मलकुमार फडकुले  सभागृहात सेवानिवृत्त नायब तहसीलदार व सोनार समाज संघटनेचे उपाध्यक्ष  विजयकुमार पोतदार  यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि लक्षवेधी  कामगिरी बद्दल अपूर्वा  अभिमित ज्ञानपीठ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विध्यमाने राज्यस्तरीय समाजभूषण रत्न पुरस्कार प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर यांचे हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 

यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष  ला. ईश्वर झुंजा, अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ सोलापूर चे अध्यक्ष  ला. अभिजित भांजे, संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती, अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ  ला. अशोक भांजे, खजिनदार  चंद्रकांत कुलकर्णी, सचिव शलाका कुलकर्णी, माजी प्रांतपाल  ला. कापसे साहेब आदींच्या उपस्थित संपन्न झाला.  विजयकुमार पोतदार  यांचा, पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form