अकलूज प्रतिनिधी ---
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार मा.दिपकआबा साळुंखे यांनी अकलूजचे सुपुत्र राजीव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे नेते अजितदादा पवार यांच्या विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविल्याने त्यांना अकलूज शहर अध्यक्षपदाचे पत्र मा.दिपकआबांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी जनतेचे आमदार उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी व सोलापूर जिल्हा नियोजन कमिटी सदस्य सुरेशआबा पालवे, माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते अशोकदादा गायकवाड, माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल ढेरे तसेच माळशिरस तालुका राष्ट्रवादीचे युवा नेते अभिषेक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
राजकीय वार्ता