पंढरपूर (प्रतिनिधी):-
शिस्त, संस्कार, नियोजन, धार्मिकता, आध्यात्मिकता, योग, महिलांचे आरोग्य या गुणांसह महिलांच्या सुरक्षेसह संघटन कौशल्याला उभारी देत, समन्वय साधत असलेल्या योगशिक्षिका डॉ ज्योती शेटे यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे प्रदेश उपाध्यक्षा मंगला वाघ, प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे,जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेणारे, आदींनी जाहीर केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदासाठी अनेक महिला इच्छुक असताना, पंढरपूर शहरात महिलांशी संवाद साधून, समन्वय साधत असलेल्या योगशिक्षिका डॉ ज्योती शेटे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे प्रदेश उपाध्यक्षा मंगला वाघ,प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे,जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेणारे, आदींनी जाहीर केले. तसेच पंढरपूर महिला भाजपाला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी दांडगा जनसंपर्क असलेली, महिलांच्या आरोग्य सुरक्षेसह, महिलांच्या समन्वयाला प्राधान्य देणारी, डॉक्टर व योगशिक्षिका मिळाली आहे, अशा शब्दांत भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा मंगला वाघ यांनी कृतज्ञता व्यक्त करत आनंद झाला असल्याचे नमूद केले.
डॉ ज्योती शेटे यांचा सत्कार पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी उस्फुर्तपणे करण्यात आला. तसेच अनेक महिलांनी डॉ ज्योती शेटे यांचेकडून अपेक्षा व्यक्त करत, आनंद साजरा करून, संपर्कात राहून, भाजप महिला मोर्चा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले आहे.
Tags
राजकीय वार्ता