श्रीरामपूर प्रतिनिधी -
श्रीक्षेत्र सराला बेट गोदाधाम विकासासाठी पत्रकार बांधवांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी केले आहे
श्री क्षेत्र सराला बेट या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी दैनिक समर्थ गावकरी समुहाच्या वतीने कॅलेंडर डायरी यांचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करून डॉ विश्वासराव आरोटे यांनी विविध भेट वस्तु प्रदान करत महाराजांचा सन्मान केला तसेच दैनिक सार्वमत वर्धापन दिनानिमित्त श्रीक्षेत्र सराला बेट येथील माहिती अंकात प्रकाशीत झाल्याने पत्रकार राजेंद्र देसाई यांचे गुरुवर्य रामगीरीजी महाराज यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी श्रीक्षेत्र सराला बेट विश्वस्त मधुकर महाराज तसेच दैनिक समर्थ गावकरी समूहाचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर पत्रकार राजेन्द्र देसाई वांजरगाव येथील सरपंच सलिम पठाण उपसरपंच जावेद सय्यद जमशेद सय्यद तसेच मोठ्या संख्येने भक्त मंडळ सेवक वृंद उपस्थित होते पत्रकार बांधवांसाठी शिर्डी या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशन घेणार असून आपण आशीर्वाद व मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ विश्वासराव आरोटे यांनी केले
यावेळी महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी होकार देत आमचे आशीर्वाद व स्नेह सर्वांच्या पाठीशी असल्याचे मत व्यक्त केले
विश्वस्त मधुकर महाराज यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
Tags
सामाजिक वार्ता