पंढरपूर प्रतिनिधी --
दि. 19-02-2024 रोजी सकाळी 9.30 वा. 65 एकर पंढरपूर समोर ठिय्या व भजन आंदोलन अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून केले जाणार आहे. हे आंदोलन शांततेत केले जाणार आहे. आम्हाला 65एकर प्लॉट वाटपचा खूप त्रास होत आहे. प्लॉट वाटप साठी सर्व दिंडी प्रमुख यांना 14-02-2024 रोजी फॉर्म भरण्यासाठी व प्लॉट वाटपसाठी बोलावले होते. पण प्लॉट वाटप केले नाही. सर्व दिंडी प्रमुख आपापली पालखी, दिंडी सोडून त्यांचे कडे पंढरपुरला आले होते. तिथे कसलीच तयारी नव्हती. साधा एक टेबल सुद्धा नव्हता. 15-02-2024 रोजी प्लॉट वाटप केले जाईल असे आश्वासन दिले होते. त्याही दिवशी दुपार पर्यंत कसलीच हालचाल प्रशासन करत नव्हते असे वातावरण पंढरपूर 65 मध्ये दिसत होते. बहुतेक तेथील अधिकारी हे हिंदु विरोधी आहेत असा संशय येत आहे. कारण हा त्रास प्रत्येक तीन महिन्या नंतर प्रत्येक वारीला होत आहे. परंतू याची कुणीच दखल घेत नाही. लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे दिले आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल द्वारे निवेदन दिले आहे. तरी हा त्रास बंद होत नाही. वारकरी हे संस्कृती, परंपरा सांभाळण्यासाठी दिंडी काढतात. हा त्रास सहन होत नसल्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून दि 19-02-2024 रोजी सकाळी 9.30 वा. 65 एकर पंढरपूर समोर ठिय्या व भजन आंदोलन केले जाणार आहे .
आपला
सुधाकर महाराज इंगळे
राष्ट्रिय अध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळ मो. 9422462681
Tags
सामाजिक वार्ता