पंढरपूर येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज ७३८ वा समाधी सोहळा निमित्त विविध कार्यक्रम...

पंढरपूर (प्रतिनिधी)- 
येथे 'विश्वकर्मा निवास' तानाजी चौक येथे संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या मूळ वास्तव्य (जन्म) स्थानी विद्यमान वंशजा
मार्फत प्रतिवर्षाप्रमाणें श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज यांचा ७३८ वा समाधी सोहळा उत्सव दि. २२/२/२०२४ ते दि. २८/२/ २०२४ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
याप्रसंगी विद्यमान वंशज ह. भ. प.प्रमोद महाराज महामुनी यांनी सांगितले की दि.२२ रोजी नरहरी महाराज महापूजा, कलशपूजन, ग्रंथपूजन इ.कार्यक्रम मान्यवरांच्या शुभहस्ते होईल.तसेच दररोज सकाळी महापूजा,
अभिषेक,श्रीविष्णुसहस्रनामपाठ, स. ९ ते १० नाममंत्र जप, दु. ११ ते१२:३०नरहरी
महाराज गाथ्यावरील भजन, हरिपाठ, रात्रौ ७ ते ९ कीर्तनादि कार्यक्रम होतील. यावेळी ह. भ. प. दर्शनमहाराज बडवे, गुरूवर्य धोंडोपंत दादा फडावरील,ह.भ.प. हरिभाऊ महाराज इंगळे, ह.भ.प.ऋषिकेश महाराज क्षिरसागर, ह.भ.प.माणिक महाराज मेहुणकर,ह.भ.प. प्रमोद महाराज महामुनी आदिंची हरिकीर्तने होतील.तर पुण्यतिथी दिनी दि. २७ रोजी सौ व श्री सुनिल गजानन दीक्षित भंडीशेगाव यांच्या हस्ते पुजन करण्यात येईल व दु.१२:०५ वा.समाधीवर व पादुकांवर पुष्पवर्षाव होईल. रात्रौ ७ ते ९ विद्यमान वंशज ह. भ. प. प्रमोद महाराज महामुनी यांचे नरहरी महाराज जीवन चरित्रावर सुश्राव्य कीर्तन होईल.दि. २८ रोजी स. १० ते १२ काल्याचे कीर्तन ह.भ.प. केशवदास महाराज नामदास यांचे होईल यांनतर महाप्रसाद वाटप करण्यात येईल.
तरी समाज बांधव व नरहरी भक्तप्रेमी , भाविक, भक्तांनी सदर कार्यक्रमास आवार्जुन उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक नरहरी महाराजांचे वंशज चि.  शंकर प्रमोद महामुनी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form