१५१ बटूची सामुहिक मोफत मुंज वेदपाठक परिवाराचे कार्य समाजास प्रेरणादायी

अक्कलकोट मध्ये पार पडला शानदार राज्यस्तरीय सोहळा...
अक्कलकोट -दि. 12 
चंद्रकांत दादा वेदपाठक
व संपूर्ण वेदपाठक यांचे सामाजिक कार्य पांचाळ समाजासाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद कार्य आहे. वेदपाठक परिवार आयोजित राज्यस्तरिय मोफत मौंजीबंधन अक्षता कार्यक्रम समाजातील गरजू लोकांना दिलासा देणारी आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यानी केले.
    
पांचाळ समाजातील गरजु १५१ मुलांचे राज्य स्तरीय सामुदायिक मोफत उपनयन संस्कार मुंज कार्यक्रम अक्षता सोहळा श्री म.नि. प्र. बसवलिंग महास्वामीजी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,दै. तरूण भारताचे निवासी संपादक प्रशांत माने, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, दिनेश काटकर, माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे, माजी उपनगराध्यक्ष अशपाक बळोरगी, माजी प्रांतपाल राजशेखर कापसे,राजेद्र हत्ते, रासपाचे पश्चिम विभाग राज्य
उपाध्यक्ष सुनिल बंडगर ता. प्र. कामगार. सेना स्वामीनाथ हेगडे शिवसेना शहर महिला प्रमुख वैशाली हावनुर, राजन दिक्षित, काशीनाथ पोतदार, अनिल पोतदार, रामानंद तपासे, सुनिल पंडीत, संजय बनकर, महेश धाराशिवकर,प्रसाद पोतदार रहुविर दिक्षित, अरुण पोतदार संतोष भंडारकवठेकर, सुनिल महामुनी बाळकृष्ण बहुलेकर, निलेश नायगावकर ,अशोक काटकर ,विनोद पोतदार,नितीन दिक्षित आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला महाराष्ट्र राज्या सह कर्नाटक राज्यातील सुमारे दोन हजार पेक्षा अधिक पांचाळ समाज बांधव यानिमित्याने एकत्र आला होता.
याप्रसंगी माजी आ. म्हेत्रे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पत्रकार चंद्रकांतदादा वेदपाठक यांच्या सामाजिक कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली यावेळी तरूण भारतचे संपादक प्रशांत माने  म्हणाले मातृ ऋण पितृ ऋण समाज ऋण राष्ट्र ऋण फेडणे आपली संस्कृती आहे. तसे पत्रकार चंद्रकांत दादा वेदपाठक व वेदपाठक परिवार समाज ऋण फेडण्याचे मोठे कार्य करीत आहेत असे गौरवोद्वार राज्यां ओबीसी संघटनेचे अध्यक्ष प्रा राजन दिक्षित यानी यावेळी काढले. सर्व बटुना यावेळी मान्यवरांनी शुभाशिर्वाद देऊन पुढील जीवनास शुभेच्छा व्यक्त केल्या.
    सर्व बटुची वाजत गाजत फटाक्याची आताषबाजीत शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा मिरवणुक काढण्यात आली.
     धार्मिक विधी मंत्रोप्पच्चारात संपन्न झाले हळदी कार्यक्रम बटूचे चौल संस्कार पुण्यावाहवचन देवप्रतिष्ठापना होमहवन आहुती आदि धार्मीक कार्यक्रम झाले मान्यवरांचा चंद्रकांत वेदपाठक परिवाराकडून सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय मोफत सामुदायिक १५१ बटुचा मौजीबंधन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रिया आकाश वेदपाठक, अंबुबाई चंद्रकांत वेदपाठक,गंगुबाई विठ्ठल वेदपाठक, शशीकला सुरेश वेदपाठक,अश्विनी अनिल वेदपाठक ,ऐश्वर्या राहुल वेदपाठक ,दिपक पोतदार,श्रध्दा सागर वेदपाठक ,अस्मिता किरण वेदपाठक, लक्ष्मी ओंकार वेदपाठक यांच्यासह चंद्रकांत दादा वेदपाठक मित्र परिवाराचे असंख्य ज्ञात अज्ञात मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form