मंगळवेढा तालुक्यातील २४ गावाचा पाणी प्रश्न बाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी यावर आवाज उठविणार आहे. :- आ. प्रणितीताई शिंदे


मंगळवेढा प्रतिनिधी-- 
मंगळवेढा तालुक्यातील २४ गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणीप्रश्नी बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.

मंगळवेढ़याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, सत्ता मी लहानपणापासून उपभोगली आहे, सत्तेसाठी व टक्केवारीसाठी राजकारण मला करायचे नाही. सत्तेपेक्षा लोकांचे प्रश्न महत्वाचे आणि आव्हान वाटतात म्हणून त्यासाठी प्रयत्नशील आहे.  इतर कामासाठी कोट्यावधी खर्च होताना पाण्यासाठी निधी देणे ही शासनासाठी किरकोळ बाब आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा प्रश्न उपस्थित केला होता परंतु विषय अर्धवट घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यामध्ये लक्ष घातले नाही, अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता तर अर्धवट पाणी मिळाले असते. निवडणूक असो वा नसो मी मंगळवेढा तालुक्याच्या या २४ गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे, येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेढ़याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठविणार आहे. काम करण्याऱ्याला विसरू नका असे सांगत दोन वेळा सत्ता मिळूनही देखील मंगळवेढाच्या विकासासाठी केलेल्या पाच गोष्टी सांगा. दोनदा संधी देऊन तालुक्यासाठी काहीच केलं नसेल त्यांना परत का संधी द्यायची. असा प्रश्न यावेळी बोलताना उपस्थित केला. 

पाणी परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी मंगळवेढ्याने पाणी चळवळीत दिलेल्या योगदानाची माहिती दिली तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी कमी दाबाने मिळत आहे असे सांगितले.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, मनोज यलगुलवार, सरपंच बिरुदेव लक्ष्मण घोगरे निंबोणी, लक्ष्मण आप्पाराया गायकवाड भाळवणी, दत्तात्रय निवृत्ती खांडेकर जिती, संजय सिंग वसंत रजपूत खडकी, कुंडलिक दत्तात्रय लेंडवे लेंडवे चिंचाळे, अनिल कुमार विठ्ठलराव दुधाळ खवे, शशांक थोरबोले रड्डे, माधव आनंद आकळे हाजापूर, अँड नंदकुमार पवार, सुनंजय पवार, दिलीप जाधव, मारूती वाकडे, फिरोज मुलाणी, दादा पवार, अर्जुनराव पाटील, अमर सुर्यवंशी, नाथा ऐवळे, मनोज माळी, रविकिरण कोळेकर, पांडुरंग माळी, पांडुरंग जावळे, विष्णुपंत शिंदे, बापू अवघडे, पांडुरंग निराळे, आयेशा शेख, सुनील थोरबोले, अर्जुन खांडेकर, शहाजी कांबळे, जयश्री कवचाळे, सुनिता अवघडे, अमोल म्हमाने, बजरंग चौगुले, शाहजहान शेख, नामदेव डांगे, मुबारक शेख, आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक युवकचे तालुकाध्यक्ष अँड रविकरण कोळेकर यांनी केले, अँड नंदकुमार पवार, फिरोज मुलाणी, माधवानंद आकळे, बिरुदेव घोगरे, लक्ष्मण गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले. . उपस्थितांचे आभार मनोज माळी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form