पंढरपूर प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांनी किरकसाल गावास भेट दिली.यावेळीनैसर्गिक विविधतेने नटलेल्या पर्वत रांगामध्ये जैव विविधता जोपासत सातारा जिल्ह्यातील किरकसाल गावाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप छोटे गाव आहे. अटल भूजल योजने अंतर्गत या गावास पन्नास लाखाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या भूजल योजनेमुळे किरकसाल गावातील व आसपासच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. याचबरोबर
महाराष्ट्रात प्रथमच लांडगा संवर्धन म्हणून जोपासना करणारे गाव म्हणून किरकसाल प्रसिद्ध आहे. असंख्य प्रजातीचे फुलपाखरू व पक्षांच्या प्रजातीचे जतन केले आहे. शाश्वत विकास ध्येय उपक्रमाअंतर्गत प्राथमिक शाळेमध्ये विविध प्रजातीचे वृक्षारोपण मास कम्युनिकेशन विभागामार्फत करण्यात आले.
यावेळीकर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खिलारे सर, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. बलवंत सर, डॉ. नलवडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
.
Tags
शैक्षणिक वार्ता