वेणुनगर, दि.०६
वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे व प्रादेशिक सहसंचालक, सोलापूर यांचे परिपत्रक अन्वये ऊस तोडणी मजूरांना संपूर्ण हंगाम कालावधीत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे मदतीने कमीत कमी ३ वेळा वैद्यकीय तपासणी करणेत यावी, असे आदेश दिलेले आहेत. त्यास अनुसरुन कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे मार्गदर्शनानुसार कारखान्याचे वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०६.०१.२०२४ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये आपले कारखान्याकडे सन २०२३-२४ हंगामात ऊस तोडणी मजूरांकरिता मोफत क्षयरोग तपासणी व इतर सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करणेत आले होते. सदर शिबीरादरम्यान क्षयरोग तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, ई.सी.जी. अस्थीरोग व स्त्रीरोग तपासणी अशा विविध तपासणी करुन त्यावरील उपचार मोफत करणेत आले. सदर शिबीराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक श्री कालिदास रघुनाथ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
हे शिबीर यशस्वी होणेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी कसबे, डॉ. सचिन गुटाळ समुदाय आरोग्य अधिकारी गुरसाळे, डॉ. स्वरूप साळुंखे, डॉ. सचिन देवकते समुदाय आरोग्य अधिकारी मेंढापूर, डॉ. अनिरुध्द नाईकनवरे समुदाय आरोग्य अधिकारी भोसे, के. एस. इंगळे आरोग्य सेवक गुरसाळे, श्रीमती वाडकर आर. पी. आरोग्यसेविका गुरसाळे व अनिल माने, गंगाधर बगले प्राथमिक आरोग्य केंद्र गुरसाळे यांचा सर्व स्टाफ व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले. या शिबीराचा बहुसंख्य ऊसतोड मजुर व कारखान्याचे कर्मचारी यांनी लाभ घेतला, तसेच दि.१७.०१.२०२४ रोजी कारखाना प्रशासकीय इमारत पहिल्यामजल्यावरती सकाळी ११ ते २ यावेळेत क्षयरोग तपासणी व सर्व रोग निदान तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड पांनी केले आहे.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक व सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, तोडणी वाहतुक ठेकेदार, ऊसतोडणी मजुर, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता