महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने सत्कार
पंढरपूर प्रतिनिधी ---
रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयात प्रसिद्धी विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र पंढरपूर व इंटायर मास मिडिया आणि कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिन समारंभात
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा पंढरपूर यांच्यावतीने फेटा, शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, पंढरपूर तालुका अध्यक्ष रामदास नागटिळक, पंढरपूर शहराध्यक्ष विनोद पोतदार, कार्याध्यक्ष नागेश आदापुरे,तालूका सचिव संजय ननवरे, शहर सचिव कुमार कोरे, प्रसिद्ध प्रमुख रवि कोळी यांच्या उपस्थितीत होते.
सदर आयोजित पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. रविंद्र चिंचोलकर होते तर मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, संपादक शिवाजी शिंदे,उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य राजेश कवडे कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक युवराज अवताडे, परीक्षा नियंत्रक डॉ. राजाराम राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता