पंढरपूर प्रतिनिधी ---
न्यु सातारा समूह मुंबई संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी येथे दि.३१ डिसेंम्बर ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत रणसंग्राम क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला होता.
सदर महोत्सवाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे व उपप्राचार्य विशाल बाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी क्रीडा प्रमुख प्रा. विश्वनाथ कुंभार तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
एकाग्रता, कष्ट व निष्ठा या तीन गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील हिमालय सर करू शकाल असा मोलाचा संदेश संस्था प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडगे यांनी विद्यार्थ्यांना दिला.सदर क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी व्हॉलीबॉल व ॲथलेटिक्स या खेळ प्रकारांचे सादरीकरण सहभागी विद्यार्थ्यांद्वारे करण्यात. सदर क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी खो-खो, कबड्डी तसेच इंडोर गेम्स चेस,
कॅरम इत्यादी खेळांचे सामने खेळविण्यात आले. मैदानी खेळ प्रकारांमध्ये सर्व सर्वसामान्यांचे पंच म्हणून मेकॅनिकल विभागाचे लॅब असिस्टंट गणेश पडवळकर तसेच प्रथम वर्षाचे प्राध्यापक सचिन शेंडगे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमासाठी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब निकम यांनी शुभेच्छा दिल्या.स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा समितीतील सर्व प्रमुख विश्वनाथ कुंभार , गणेश पडवळकर ,प्रसाद कुलकर्णी, चैताली जाधव मॅडम , सपना दोडमिसे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
Tags
शैक्षणिक वार्ता