स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १९२ वी जयंती साजरी
पंढरपूर प्रतिनिधी ---
‘महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठी योगदान कधीही न विसरण्याजोगे आहे. विवाहानंतर ज्योतिबांनी ठरवले की, जोपर्यंत सावित्री शिकत नाही तोपर्यंत समाजातील स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला करता येणार नाही. आज यशस्वी पुरुषामागे स्त्री असते हे जितकं खरं आहे तितकेच एका यशस्वी स्त्री मागे पुरुष खंबीरपणे उभा असतो. सावित्रीबाईंना ज्योतिबांची प्रेरणा होती. ज्योतिबा व सावित्री यांचे कार्य अखेरपर्यंत एकमेकांना अनुरूप असे राहिले. असमानतेच्या विरोधात उभे राहून स्त्रीच्या शिक्षणाची ज्योत जागृत ठेवण्याचे कार्य त्यांनी अखंडपणे केले. सावित्रीबाई ह्या सामान्यातील असामान्य महिला होत्या. त्यांच्या कार्यामुळे त्या सुधारणावादी आणि स्त्री शिक्षणातील दीपस्तंभ बनल्या. त्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन केल्या. ध्येयाने प्रेरित झालेली माणसं ऐतिहासिक कार्य करू शकतात. आपली स्वेरी ही शिक्षणसंस्था त्यापैकीच एक आहे. सुधारणावादी आणि जागतिक कीर्तीचे विचार घेणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सावित्रीबाईंचे विचार आजच्या काळात प्रेरणादायी ठरतात.’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सौ.स्मिता पाटील यांनी केले.
यावेळी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लेडीज हॉस्टेलमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १९२ व्या जयंती निमित्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सौ.स्मिता पाटील या प्रमुख पाहुणे होत्या. तर अध्यक्षस्थानी प्रा. ज्ञानेश्वर (माऊली) जाधव हे होते.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, विश्वस्त एच.एम.बागल, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. करण पाटील, डॉ. मोहन ठाकरे, विद्यार्थिनी सचिवा राजनंदिनी पाटील, इतर प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होत्या. यावेळी अनेक विद्यार्थिनींनी यशस्वी महिलांच्या गरुडझेपेवर विचार मांडले. सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकून उपस्थितांचे आभार मानले.
Tags
शैक्षणिक वार्ता