तावशी : ( प्रतिनिधी )
पंढरपूर येथील सौ साधना हंबिरराव बारकुंड(होनाळीकर) यांना राजस्थान येथील झूंझूनूच्या जेजेटी विद्यापीठाने गणित विषयाची पीएचडी प्रदान केली आहे. “अ प्रॅग्म्याटिक ॲप्रोच ॲाफ द शॅार्टेस्ट पाथ अल्गोरिदम “ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला. त्यांना दिल्ली येथील डॅा अशुतोष शर्मा व पुणे येथील डॅा हरिभाऊ भापकर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच त्यांचा विषयाची कॅापिराईट नोंदणी केलेली आहे.
त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर येथील रुक्मिणी महिला विद्यापीठ येथून झाले. तसेच पदवी पर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर कॅालेजमधून झाले व गणित विषयाची उच्चपदवी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून केली.त्यांनी संगणक विषयाची उच्चपदवीदेखील शिवाजी विद्यापीठातून प्राप्त केलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे व त्यासाठी त्यांना आई वडील श्री. व सौ . बारकुंड सासू सासरे श्री. व सौ. होनाळीकर तसेच पती व मुलांचे सहकार्य लाभले.
Tags
शैक्षणिक वार्ता