सांगोला (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा जन्मच मूळात संघर्षाच्या मुशीतून झाला आहे . सहा दशकांहून अधिक काळ शिक्षक समितीने राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे . सोलापूर जिल्हा शिक्षक समितीला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते डाॕ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली .
शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेचे नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश पवार , कार्यकारी अध्यक्ष सुनिल कोरे , जिल्हा संघटक गजानन लिगाडे व नूतन राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बंडगर यांनी सांगोला येथील स्व. आ. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डाॕ. बाबासाहेब देशमुख यांनी सर्व नूतन पदाधिकारी यांचा परिचय करुन घेवून सर्वांचा सत्कार केला व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी डाॕ. देशमुख यांनी शिक्षक समिती व देशमुख कुटूंबिय यांच्यामध्ये मागील पन्नास वर्षांपासून जे आपुलकीचे नाते आहे ते कायमस्वरुपी वृद्धींगत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली .
यावेळी सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने ही नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन भारत कुलकर्णी , शिक्षक नेते अमोघसिद्ध कोळी , मंगळवेढा शिक्षक समितीचे नेते रावसाहेब सुर्यवंशी , तालुकाध्यक्ष विठ्ठलराव ताटे , सांगोला तालुकाध्यक्ष भारत लवटे , सरचिटणीस भागवत भाटेकर यांच्यासह तालुका सोसायटी संचालक राहुल चंदनशिवे , मुरलीधर गोडसे , संतोष कांबळे तसेच जिल्हा नेते राजेंद्र माने , सुनिल डिगोळे , अंकुश वाघमोडे , सचिन गरंडे , बशीरभाई मुलाणी , शास्त्रे गुरुजी , सुरेश ढोले , आबासाहेब पांढरे, प्रमोद इंगवले , आनंदा बामणे , एकनाथ गुरव , चंद्रकांत भोरे ,अजित पाटील , युवराज सावंत , पंढरपूरचे मा.चेअरमन गुंडिबा कांबळे , बालाजी शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .
Tags
शैक्षणिक वार्ता