मी शब्द पाळणारा खासदार कडलास येथील सत्कारावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे उदगार

सांगोला/प्रतिनिधी :
 सोमवार दिनांक १५जानेवारी रोजी कडलास येथे कडलास ग्रामस्थांनी टेंभू योजनेमध्ये माणनदीचा समावेश केल्याबद्दल व म्हैशाळ योजनेतून कोरडा नदीवर सर्व बंधारे भरून देणार, अप्रुका नदीवरील बंधारे भरून देणार असल्याबद्दल तसेच वंचित गावांचा टेंभू योजना व म्हैशाळ योजना  यामध्ये समावेश केला असल्याबद्दल  माढा लोकसभेचे  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार शहाजीबापू पाटील ,माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, यांचा ढोल ताशाच्या गजरामध्ये  जेसीबी वरून पुष्टी करून  स्वागत करू सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये  मी म्हणालो होतो की या पुढच्या निवडणुका  पाण्याच्या प्रश्नावर होणार नाहीत  तो शब्द मी आज पूर्ण केला आहे  यावेळी पुढे बोलताना म्हणाले की २०१९ लोकसभा  निवडणुकीमध्ये माझ्या जिभेवरती सरस्वती होती की काय माहित  मी ज्या ज्या  कामांच्या बद्दल बोललो  तेथे काम सध्या पूर्णत्वास  जात आहेत
 
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की कडलास हे गाव क्रांतीकारक गाव असून या गावाने  मला पाहायला मिळाले नाही परंतु बैलगाड्याचा मोर्चा सांगोला तहसील कचेरीवर काढून प्रभावी आंदोलन केले होते तसेच या गावातील  मंडळींनी  जनावरासह तहसील कचेरीवर  दहा-पंधरा दिवसाचे उपोषण केले होते  सांगली ऑफिस असेल किंवा पुणे ऑफिस असेल  हे ठिकाणी या गावातील शिलेदारांनी पाण्यासाठी   उपोषण केले होते  त्यामुळे हे गाव क्रांतिकारी गाव आहे या अगोदर सांगोल्यामध्ये  कर्तुत्वाचा दुष्काळ असल्यामुळे  तालुक्याला पाणी येऊ शकले नाही   गेल्या चार वर्षाच्या काळामध्ये सांगोला तालुक्यातील पाण्याच्या सर्व योजना जवळपास मार्गी लागल्या आहेत लवकरच उजनीचे ही पाणी  सांगोल्यासाठी घेऊन येत आहे  यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले
 
माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपली विचार व्यक्त करत असताना मी आणि आमदार शहाजी बापू पाटील  एक ही गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही टेल टू हेड पाणी देण्यासाठी बापू आणि मी प्रयत्न करणार आहे  ज्यावेळी येथील बळीराजा अडचणीत असेल त्यावेळी बळीराजाला मदत करण्यासाठी   आम्ही वेळोवेळी प्रयत्न केला आहे आमदार शहाजी बापू पाटील आमदार झाल्यापासून  सांगोला तालुक्यामध्ये विकासाचा डोंगर उभा राहताना आपल्याला दिसून येत आहे  असे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले यावेळी  सुभाष इंगोले अरुण बिले दादासाहेब लवटे नवनाथ पवार आप्पासाहेब देशमुख बाळासाहेब सरगर सुनील नाना पवार डॉ विजय बाबर दीपक पवार गुंडा दादा खटकाळे युवराज पाटील संजय देशमुख समीर पाटील महादेव कांबळे दिगंबर भजनावळे संतोष जाधव अमोल यादव,सतीश लेंडवे संतोष गायकवाड, पप्पू लेंडवे, महेश लेंडवे,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form