*प्रवास अर्थ साम्राज्यातून अध्यात्माकडे...!
व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले अनेक वर्षापासून सोलापुरात व्यावसायिक आस्थापना, संस्था, एकल व्यापारी यांचे आर्थिक व्यवस्थापन व सल्लागार म्हणून कार्यरत . सोलापुरातील विकास सह बँकेच्या *विकासात* सर्वोत्तम योगदान. बँकेचे तज्ञ संचालक म्हणून कार्यरत.अनेक वर्षे बँकेचे चेअरमनपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली l बँकेच्या माध्यमातून स्वामी गोविंददेव गिरी यांचे जनतेसाठी सत्संगाचे आयोजन तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिरे आयोजित केली . सरांच्या जीवनातील विशेष नोंद घेण्यासारखे कार्य म्हणजे त्यांचे रोटरी क्लब च्या माध्यमातून त्यांनी केलेले सेवाधर्म. *रोटरी क्लब च्या अन्नपूर्णा योजने चे प्रणेते* त्यांचे विशेष योगदान असून गरीब, अनाथ, अपंग, वृध्द असहाय , बेघर अशा व्यक्तींना रोज दोनवेळ जेवणाचा डबा घरपोच पोहोच करण्याची योजना त्यांनी राबविली. या योजनेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. वंचितांचे त्यांना आशीर्वाद लाभले. त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व त्यांनी निर्माण केले . माझा सरांशी संबंध आला तो पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय व रूग्णालयाच्या माध्यमातून संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन , नियोजन व मार्गदर्शक अशी त्यांची भूमिका होती . 2001पासून ते आजतागायत स्नेहबंध टिकून आहेत. दि कराड अर्बन बँकेच्या सोलापूर च्या नवनिर्माण शाखेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांची आवर्जून उपस्थिती होती. रोटरी क्लब च्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत ही पूर्ण समर्पण भावनेने त्यांनी पूर्णत्वास नेले. कदाचित त्याचीच परतफेड म्हणून स्वामी गोविंददेव गिरी यांच्या माध्यमातून अयोध्या जी प्रभू रामचंद्राची सेवा करण्याची सर्वोच्य संधी त्यांना प्राप्त झाली.
*श्री अयोध्या रामजन्मभूमी न्यासाची नियमावली / कार्य संचालन, देशभरातून मंदिर व परिसर उभारणी करीता येणाऱ्या देणग्या , भांडवली गुंतवणूक व खर्च याचे आर्थिक व्यवस्थापन व नियोजन, सॉफ्टवेअर उभारणी, लेखाविभाग उभारणी या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आहेत याचे सर्व श्रेय सरांचे गुरु स्वामी श्री गोविन्द देव गिरी जी यांना देतात.*
त्यांच्या या निगर्वी व्यक्तिमत्वास, समर्पण कार्यास नमन..!
श्रीनिवास पोटाबत्ती
वरिष्ठ अधिकारी
दि कराड अर्बन को ऑप बँक लि., कराड
शाखा - कर्वे रोड, पुणे - 38
Tags
सामाजिक वार्ता