प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात फुलांची आरास, विद्युत रोषणाई, देवाला पारंपारिक दागिने

 
७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संत तुकाराम भवन व भक्तनिवास येथे ध्वजारोहण -- व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड यांची माहिती 
पंढरपूर (ता.26) :- दिनांक 26 जानेवारी, 2024 रोजी भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. संत तुकाराम भवन व श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम, श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात फुलांची आरास, विद्युत रोषणाई व श्रीला पारंपारिक अलंकार परिधान करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड यांनी माहिती दिली.
श्री.संत तुकाराम भवन व श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे अनुक्रमे मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे व श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) यांनी राष्ट्रध्वजारोहण केले. यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार व बलभिम पावले तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाची फुलांची आकर्षक आरास/सजावट करण्यात आली आहे. दानशूर भाविक श्री.सचिन चव्हाण, पुणे यांनी ही मोफत सेवा दिली असून, याकामी 1.5 ते 2 टन झेंडू व शेवंती फुलांचा वापर केला आहे. तसेच श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर, नामदेव पायरी, श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास व दर्शनमंडपावर आकर्षक नयनरम्य अशी तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 
श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये आजच्या भोजनप्रसादात गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला असून, श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक दुपारी पोषाखावेळी अलंकार परिधान करण्यात येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form