नेहरू युवा मंडळाच्या तर्फे अक्षय मोरे यांचा सत्कार संपन्न

पंढरपूर प्रतिनिधी --
मुंडेवाडी गावचे सुपुत्र अक्षय तानाजी मोरे यांचे अर्थ व नियोजन मंत्रालय महाराष्ट्र सहाय्यक संशोधन अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल नेहरू युवा मंडळ यांच्या वतीने व शिक्षक आमदार दत्तात्रेय अच्युतराव सावंत यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. 

अक्षय मोरे यांचे पालक तानाजी मोरे यांचा सत्कार राहुल नागणे यांनी केला. त्यांचे चुलते पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुदाम मोरे यांचा सत्कार नवनाथ भाऊ दांडगे यांनी केला. अध्यक्षस्थानी सावंत सर होते.
सावंत सरांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी नेहरू युवा मंडळाच्या वतीने अक्षय मोरे यांचा श्रीफळ, गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र फुगारे यांनी आपले मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना संबोधित करताना बोलले की "शुद्ध बीज पोटी फळे रसाळ गोमटी अशाच पद्धतीने मोरे परिवारामध्ये  अक्षय आनंद मुले मोरे परिवार सरकारी अधिकारी म्हणून लाभली".

या कार्यक्रमाप्रसंगी कोंढारकी गावचे ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, राम पाटील, सिद्धेश्वर दांडगे, शिवाजी दांडगे, हनुमंत पाटील, आनंद मोरे, रोहित ताणगावडे, ए बी न्यूज चे संपादक गणेश गायकवाड, गोपाळ माळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सिद्धेश्वर दांडगे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form