प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय जुनियर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी


पंढरपूर प्रतिनिधी --
 श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

त्यावेळी प्रमुख अतिथी डॉ.ज्योती शेटे  उपस्थित होत्या. संस्थेच्या अध्यक्ष  सुवर्णा खंडागळे ,संस्थेचे कार्यवाह ,जितेंद्र खंडागळे व प्राचार्य प्रशांत पाटील  व पर्यवेक्षिका ,कवडे मॅडम मुख्याध्यापिका वाघ  यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी जिजाऊ गीत गायले. तर कु. संचिता पाटील , तयबा आतार यांनी भाषणे केली .तर कॉलेजमधील अधिव्याख्यात्या  शुभांगी साळुंखे यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्योती शेटे  यांनी चातुर्य, बुद्धिमान, निर्भिड, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, दूरदृष्टी स्त्री समानता जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंदाच्या जीवनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच आपण धकाधकीच्या काळामध्ये स्मरणशक्ती व रोगप्रतिकारशक्ती यांचा समतोल साधून  जीवन कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन केले .

.तसेच संस्थेचे कार्यवाह जितेंद्र खंडागळे  यांनी सर्व विद्यार्थ्यांना जिजाऊ व शिवबा समजून खूप खूप मोठे होण्याचे सांगितले प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळेस प्रशालेतील सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संतोष गायकवाड सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form