महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे कायमस्वरूपी सहकार्य राहील--- चेअरमन अभिजीत पाटील


भाळवणी प्रतिनिधी---
महिलांचे असणारे विविध प्रश्न सोडवणारे व महिलांना मदत करणाऱ्या राजश्री ताड यांच्या मदतीकरिता माझे कायमस्वरूपी सहकार्य राहील असे मत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. 
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुवर्णाताई शिवपुरे या होत्या.
यावेळी रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काकासाहेब साठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापार व उद्योग प्रदेशाध्यक्षपदी नागेश फाटे यांची निवड झाल्याबद्दल ,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक सेल पदी निवड झाल्याबद्दल प्रशांत कोळसे, भाळवणी गावचे आदर्श सरपंच राजकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांकरिता वकृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा खादी ग्रामोद्योग सोलापूर यांच्यातर्फे प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप, शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सन्मान, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण ,माता-पिता सन्मान, ओबीसी महिला व पुरुषांच्या करिता एक लाख रुपये पर्यंत कर्ज योजनेची माहिती तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज संबंधी माहिती देण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अभिजीत पाटील म्हणाले की महिलांच्यासाठी रोजगार स्वयंरोजगार सुरू करणे ही काळाची गरज आहे महिलांच्या हातांना का मिळाले पाहिजे तरच घराची चांगली प्रगती होऊ शकते असे कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी घेणे आवश्यक आहे त्यामुळे महिलांना बाजारपेठेची माहिती मिळू शकते राजश्री ताड यांच्या कार्याची कौतुक करेल तेवढे कमीच आहे यापुढेही माझ्याकडून सर्व ते सहकार्य केले जाईल असेही अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहराध्यक्ष सुभाष भोसले तालुका अध्यक्ष संदीप मांडवे पंढरपूर शहराध्यक्ष सुनंदाताई उमाटे आदी मान्यवर  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष राजश्री ताड यांनी केली.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्याकरिता वर्षा राणी शिंदे, नवाजवी इनामदार, नंदाताई पाटील, शांताबाई पिंजारी, बायडाबाई हाके, पुष्पा गुंजकर ,गिरीजाबाई केसकर, शोभाताई आहेर, राजेंद्र ताड यांनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form