प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय जुनियर कॉलेज मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी...

पंढरपूर प्रतिनिधी ---
प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 
 या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते दत्तात्रय कराळे  कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच संस्थेचे सचिव संकेत दादा खंडागळे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे दत्तात्रय कराळे यांचा सत्कार  सचिव संकेत खंडागळे यांनी केला. प्राचार्य प्रशांत पाटील यांनी संकेत खंडागळे खंडागळे यांचा सत्कार केला. 

याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी नाटिकेचे सादरीकरण केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  दत्तात्रय कराळे यांनी' मी यशस्वी होणारच' याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जोश ,उत्साह आत्मविश्वास, चिकाटी, ध्येय, मेहनत संयम ,सातत्य, सहनशीलता  या गुणसूत्री चे महत्व पटवून दिले. तसेच विनोदी कथेतून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले . यावेळी  रमेश देसाई यांच्या वाढदिवसा
निमित्त संस्थेचे सचिव संकेत खंडागळे यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देण्यात सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक ,पर्यवेक्षिका कवडे , शिक्षकेतर कर्मचारी,  विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संतोष गायकवाड  यांनी केले. तसेच संयोजन संपदा  पिंपळनेरकर  यांनी केले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form