पंढरपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पंढरपूर प्रतिनिधी ---
पंढरपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त पंढरपूर येथील फुले चौक येथे महिला नेत्या सौ.अंजलीताई आवताडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास वंदन करत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संस्कार हे शिक्षणातून रुजवले जात असतात. जर स्त्री शिक्षित असेल तर घरातील पुढील पिढीपर्यंत उचित संस्कार पोहोचू शकतील याची जाणीव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना होती.. 
याच विचाराने त्यांनी स्त्री शिक्षणासाठी क्रांतिकारी लढा दिला. प्रचंड संघर्ष सहन करून त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे..

यावेळी उपस्थित विनोद लटके,शेखर बंटी भोसले,अक्षय निंबाळकर,चंद्रकांत क्षिरसागर,स्वाती मोहिते,ज्योती जोशी,जयश्री क्षिरसागर, संचिता सगर आदी जन उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form